मोगर्याचा वास
अंगोअंगी संचारला मोगर्याचा वास
सोडला मी जेव्हा सार्या फुलांचा हव्यास
मुबलक सुखा घरी नुसताच वीट
दुःख सागरात भेटे आनंदाचे बेट
सोयीसाठी खटपट याची त्याची चाले
गंड जोपासाया सत्य वेशीला टांगले
जिद्द हेका पाहताच समतोल ढळे
घेतलेली फारकत न्यायास आढळे
-मनोज बोबडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा